अमरनाथ यात्रा
कार्यक्रम
०७.०७.२०२६
संध्याकाळी ०४:३० वा. पुणे रेल्वेस्टेशनवरून झेलम एक्सप्रेसने जम्मूकडे प्रयाण.
०८.०७.२०२६
संपूर्ण दिवस रेल्वे प्रवास.
०९.०७.२०२६
सकाळी ०९:३० वा. जम्मू तावी रेल्वेस्टेशनवर पोहोचणे. तेथून वाहनाने श्रीनगरकडे प्रयाण.
रात्री मुक्काम श्रीनगर येथे.
ज्या भाविकांना विमानाने जायचे आहे ते श्रीनगर येथे विमानाने पोहोचू शकतात.
१०.०७.२०२६
सकाळी सोनमर्गकडे प्रयाण. संध्याकाळ पर्यंत सोनमर्ग येथे पोहोचणे.
रात्री मुक्काम सोनमर्ग येथे.
११.०७.२०२६
सकाळी बालटाल येथून अमरनाथकडे प्रयाण. दर्शन करून मुक्काम.
१२.०७.२०२६
सकाळी अमरनाथ येथून सोनमर्गकडे प्रयाण.
रात्री मुक्काम सोनमर्ग येथे.
१३.०७.२०२६
सकाळी सोनमर्ग येथून श्रीनगरकडे प्रयाण.
रात्री मुक्काम श्रीनगर येथे.
१४.०७.२०२६
सकाळी श्रीनगर येथून बसने / टेम्पो ट्रॅव्हलरने जम्मूकडे प्रयाण.
संध्याकाळी ११:३० वा. झेलम एक्सप्रेसने पुणेकडे प्रयाण.
ज्या भाविकांना पुण्याला विमानाने जायचे आहे ते श्रीनगर येथून विमानाने जाऊ शकतात.
१५.०७.२०२६
संपूर्ण दिवस रेल्वे प्रवास.
१६.०७.२०२६
संध्याकाळी ०५:०० वा. पुणे रेल्वेस्टेशनवर पोहोचणे.
टीप :
अमरनाथ यात्रेसाठी फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक आहे व त्याचा खर्च वैयक्तिक राहील.
सहलीचा खर्च : ₹२१,७००/- प्रति व्यक्ती
टीप :
पुणे–श्रीनगर–पुणे विमान प्रवास करणाऱ्यांसाठी सहलीचा खर्च ₹१८,५००/- प्रति व्यक्ती अधिक (विमानखर्च).
समाविष्ट खर्च :
• पुणे ते जम्मू ३ टियर एसी तिकीट व जम्मू ते पुणे ३ टियर एसी तिकीट
• अमरनाथ यात्रेचा नोंदणी खर्च
• सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे व रात्रीचे महाराष्ट्रीयन शाकाहारी जेवण
• श्रीनगर व सोनमर्ग येथील मुक्कामाचा खर्च
• मुक्कामात प्रत्येक रूममध्ये दोन व्यक्ती
• प्रेक्षणीय स्थळांची प्रवेश फी
• जम्मू ते जम्मू टेम्पो ट्रॅव्हलर / बस
• सोबत कुशल सहल व्यवस्थापक
समाविष्ट नसलेले खर्च :
• विमानप्रवास (करावयाचा असल्यास) (पुणे / मुंबई – श्रीनगर – पुणे / मुंबई)
• घोडा, डोली, रोपवे व हेलिकॉप्टर तिकीट